पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 07:17 AM2024-04-13T07:17:22+5:302024-04-13T07:18:07+5:30

माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड; हातकणंगलेत ‘प्रकाश’पर्वाने बहुरंगी लढतीची शक्यता

West Maharashtra politics heated up; The brave Mohite finally rebelled in Madha | पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड

पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला रंगतदार वळण लागले असून महायुतीची चिंता वाढली आहे. भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते माढा मतदारसंघात शरद पवार गटाकडून १६ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या दोन आमदारांसह नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.

महायुतीसोबत असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते आ.प्रकाश आवाडे यांनी हातकणंगलेतून लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तिथे आता बहुरंगी लढत होऊ घातली आहे. कोल्हापुरात संजय मंडलिकांना लीड देणाऱ्या तालुक्यांना जादाचा पाच कोटी रुपयांचा निधी देऊ या भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे.

हातकणंगलेत नवा ट्विस्ट
भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगले मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या या घोषणेने मतदारसंघात नवा ट्विस्ट तयार झाला आहे. आवाडे याच भूमिकेवर ठाम राहिले तर या मतदारसंघातील राजकीय गुंता पुन्हा वाढणार आहे.

महायुतीत माढ्यावरून वाद
nशुक्रवारी माढा येथील भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपूर गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. आ. जयकुमार गोरे व राहुल कुल हे त्यांच्यासोबत होते. 
nअजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचा रणजीतसिंह यांना विरोध आहे. संबंधित नेत्यांनी सांगितले की जर माढ्यात अजित पवार गटाने मदत केली नाही तर भाजपही बारामतीत त्यांना मदत करणार नाही.
nदुसरीकडे उपमुख्यमंत्री पवार यांनी माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 

फडणवीस यांनी आधी स्पष्ट सांगितले असते, तर पुतण्याला माघार घ्यायला सांगितले असते. आता वेळ गेली आहे. आमच्या संस्था व्यवस्थित चालू आहेत. ईडीला घाबरत नाही.
    - जयसिंह मोहिते-पाटील 

मी भाजपसोबत : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात रणजीतसिंह महायुतीसोबतच राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. रणजीतसिंह यांनी मी भाजपचा आमदार असून, पक्षासोबतच राहणार, असे म्हटले.

साताऱ्याचा आज निर्णय
सातारची जागा उदयनराजे यांच्यासाठी भाजपला सोडण्याचा निर्णय अजित पवार गटाने अद्याप घेतलेला नाही.  वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी बैठक होणार असल्याचे समजते.
सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी   उद्धवसेनेला सांगलीची जागा गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप टोकाला गेला असून, शुक्रवारी मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी ४ अर्ज आणले.

Web Title: West Maharashtra politics heated up; The brave Mohite finally rebelled in Madha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.