सचिन वाझेच्या ‘त्या’ डायरीची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:06 IST2021-04-13T04:06:22+5:302021-04-13T04:06:22+5:30

सीबीआयने नोंदवला बारचालकाच्या जबाब लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्फोटक कारप्रकरणातील सचिन वाझेच्या हप्ता वसुलीची नोंद असलेली ...

Verification of Sachin Waze's 'that' diary | सचिन वाझेच्या ‘त्या’ डायरीची पडताळणी

सचिन वाझेच्या ‘त्या’ डायरीची पडताळणी

सीबीआयने नोंदवला बारचालकाच्या जबाब

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कारप्रकरणातील सचिन वाझेच्या हप्ता वसुलीची नोंद असलेली डायरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी केली जात आहे. वाझेची मैत्रीण मीना जॉर्जच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या या डायरीत नमूद असलेल्या एका बारमालकाचा सोमवारी जबाब नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

एनआयएने सचिन वाझेची मैत्रीण मीना जॉर्ज हिच्या मीरारोड येथील फ्लॅटमधून जप्त केलेली डायरी सीबीआयने तपासासाठी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये नमूद बार मालक महेश शेट्टीचा सोमवारी जबाब घेण्यात आला. त्यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटसचा तपशील आहे. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणाला भेटायचे, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख कोडवर्डमध्ये आहे. त्यातून हफ्त्याची गुपिते उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Verification of Sachin Waze's 'that' diary