वसईत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले

By Admin | Updated: June 19, 2015 00:11 IST2015-06-19T00:11:22+5:302015-06-19T00:11:22+5:30

वसई तालुक्यात सध्या सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Vasayat Sanyhakhali steal has increased | वसईत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले

वसईत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले

पारोळ : वसई तालुक्यात सध्या सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवारी पहाटे येथील परिचारीका कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजाराची सोनसाखळी खेचून पळ काढला. तसेच विरार येथे बाजार करण्यासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दोन दुचाकीस्वारांनी पळविली. दोन्ही घटनेची तक्रार विरार पोलिसात दाखल करण्यात आली.
या घटनेनंतर काही वेळातच वसई फाटा येथील काठीयावाड हॉटेल समोरून कामावर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातीले मंगळसूत्र खेचून चोरट्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे, या सर्व घटनेच्या वेळी चोरांनी काळ्या रंगाच्या दुचाकीचा वापर केला असल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Vasayat Sanyhakhali steal has increased