प्रकृती बिघडल्यामुळे वरवरा राव जे.जे. रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 03:26 IST2020-07-15T03:26:49+5:302020-07-15T03:26:49+5:30

राव मागील दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर तळोजा कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्यासह केंद्र सरकारकडे केली होती.

Varvara Rao J.J. Hospitalized | प्रकृती बिघडल्यामुळे वरवरा राव जे.जे. रुग्णालयात दाखल

प्रकृती बिघडल्यामुळे वरवरा राव जे.जे. रुग्णालयात दाखल

मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती ढासळली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राव मागील दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर तळोजा कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्यासह केंद्र सरकारकडे केली होती. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जे. जे.त दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे. जे.चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. त्यांना चक्कर येत असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत.

Web Title: Varvara Rao J.J. Hospitalized

टॅग्स :Mumbaiमुंबई