Ajit Pawar : तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, मग आता ते कशी समंजस भूमिका घेतील?; अजित पवारांकडून उद्धव ठाकरेंसाठी 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 13:14 IST2023-03-09T13:09:14+5:302023-03-09T13:14:22+5:30
Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सात महिने पूर्ण झाली.

Ajit Pawar : तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, मग आता ते कशी समंजस भूमिका घेतील?; अजित पवारांकडून उद्धव ठाकरेंसाठी 'बॅटिंग'
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सात महिने पूर्ण झाली. या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिला. गेल्या काही दिवसापासून हा संघर्ष वाढतच आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शत्रू नसून आमची वैचारीक लढाई असल्याचे सांगून समंजस भूमिका संदर्भात बोलून एकत्र येण्याचे संकेत दिले होते, यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एबीपी माझा' या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकत्र येण्याच्या संकेतावर प्रतिक्रिया दिली." तुम्ही उद्धव ठाकरे यांचा सगळा पक्ष फोडला आणि आता म्हणता मागे झाले आहे ते सगळ सोडून द्या", असं कस होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. यावेळी ते पहिल्यांदा सुरतला गेले. आमदारांच्या मनात आले की लगेच त्यांना चार्टर फ्लाइट मिळत होते. सुरत, गोवा, गुवाहाटी येथे त्यांना मोठा बंदोबस्त मिळाला. ही सर्व राज्ये कोणाच्या ताब्यात आहेत, तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही म्हणता मागे झालेले सोडून द्या, उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्ही पक्ष, चिन्ह काढून घेतले, तरीही समंजसची भूमिकेवर कसं बोलता, असा सवाल अजित पवार यांनी केला.
'राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. आपल्या सर्वांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतीत हे वाटलं होतं का? पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असंही अजित पवार म्हणाले.