पुलाअभावी सीएसएमटी स्थानकावर पोहोचण्यास प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 02:18 AM2019-10-27T02:18:53+5:302019-10-27T02:19:14+5:30

या मार्गावर दररोज दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. सबवेतून जायचा वेळ वाचविण्यासाठी बºयाच वेळा प्रवासी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

Traffic inconvenience of arriving at CSMT station due to bridge | पुलाअभावी सीएसएमटी स्थानकावर पोहोचण्यास प्रवाशांची गैरसोय

पुलाअभावी सीएसएमटी स्थानकावर पोहोचण्यास प्रवाशांची गैरसोय

Next

मुंबई : स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये चांगल्या स्थितीत दाखविलेला हिमालय पूल कोसळल्यामुळे मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट झाले. त्यानुसार काही पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मात्र, आठ महिन्यांपूर्वी कोसळलेल्या पुलाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा पूल बांधण्याची आवश्यकता आहे का, याबाबतच साशंकता आहे. याचा नाहक त्रास छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकवर जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे.

१४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सात प्रवासी मृत्युमुखी तर ३० लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर या पुलाचा उर्वरित सांगाडाही धोकादायक ठरल्यामुळे महापालिकेने पाडला. डॉ. डी. एन. रोडवर दुतर्फा सिग्नल बसवून टाइम्स इमारतीच्या दिशेच्या प्रवेशद्वारातून प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अद्याप तेथे नवीन पूल उभारण्यात आलेला नाही.

या मार्गावर दररोज दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. सबवेतून जायचा वेळ वाचविण्यासाठी बºयाच वेळा प्रवासी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या ठिकाणी तातडीने पूल बांधण्याच्या मागणीकडे अद्यापही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. हा पूल पुन्हा बांधावा का, याबाबतही पालिका प्रशासन पुनर्विचार करीत आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर जाणाºया हजारो प्रवाशांचे दररोज हाल होत आहेत.

अशा आहेत अडचणी...
हा पूल टाइम्सची इमारत आणि अंजुमन ए इस्लाम या पुरातन वास्तूच्या शेजारी आहे. त्यामुळे पूल उभारणीचा या वास्तूंना काही धोका निर्माण होईल का, यासाठी पुरातन वास्तू समितीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पुलाचे डिझाइन तयार करून निविदा काढाव्या लागणार आहेत, ठेकेदार नेमल्यानंतर या पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. यामध्ये बराच कालावधी लागणार असल्याने प्रत्यक्षात हा पूल कधी तयार होणार, याबाबत शाश्वती नाही.

पूल पुनर्बांधणीबाबत पुनर्विचार...
पूल पुनर्बांधणीबाबत रस्ते विभागाने वाहतूक विभागाकडून सल्ला मागविला आहे. डॉ. डी. एन. रोडवरून दररोज किती गाड्या जातात, सीएसएमटी स्थानकात दररोज येणारे प्रवासी किती, याचा अभ्यास वाहतूक विभाग करणार आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पूल पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Traffic inconvenience of arriving at CSMT station due to bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.