तिसरी सीट बेतली जीवावर; धडकेत एकाचा मृत्यू

By Admin | Updated: March 14, 2015 01:27 IST2015-03-14T01:27:29+5:302015-03-14T01:27:29+5:30

तीन सीट घेऊन जाणाऱ्या स्कूटरला ओव्हरटेक करणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात रोहित खैरगोती या स्कूटरचालकाचा

Third seat beetle alive; Death of one | तिसरी सीट बेतली जीवावर; धडकेत एकाचा मृत्यू

तिसरी सीट बेतली जीवावर; धडकेत एकाचा मृत्यू

कल्याण : तीन सीट घेऊन जाणाऱ्या स्कूटरला ओव्हरटेक करणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात रोहित खैरगोती या स्कूटरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री वालधुनी परिसरात घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित हा उल्हासनगरचा रहिवासी असून गोकुळ रामरखाणी आणि चांदणी दिलमिलाणी या मित्रांसह कल्याणहून उल्हासनगरला
घरी परतत असताना त्यांच्या
स्कूटरला अपघात झाला. दुचाकीच्या धडकेत स्कूटरवरील तिघेही खाली पडले. यात रोहित आणि गोकुळला मार लागल्याने त्यांना उपचारार्थ कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच रोहितचा मृत्यू ओढवला होता.
चांदणी हिने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून घटनेनंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. वाहनाच्या धडकेत रोहितला प्राण गमवावे लागले असले तरी स्कूटरवरील तिसरी सीट त्याच्या जीवावर बेतल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Third seat beetle alive; Death of one