अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधी संकेतस्थळावर सूचनाच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:08 AM2018-09-16T00:08:02+5:302018-09-16T00:08:27+5:30

प्रवेशाबाबत संभ्रम कायम : विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीचा सूर

There are no suggestions on the 11th entry process | अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधी संकेतस्थळावर सूचनाच नाहीत

अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधी संकेतस्थळावर सूचनाच नाहीत

मुंबई : सप्टेंबर महिना अर्धा संपला तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. दुसरी प्राधान्य प्रवेश फेरी पूर्ण झाली असली तरी यात किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, किती प्रवेश निश्चित झाले, याची आकडेवारी उपसंचालक कार्यालयाकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यातच दुसऱ्या प्राधान्य फेरीनंतर कोणत्याच सूचना अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने प्रवेश न मिळालेले विद्यार्थी तणावात आहेत. यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी, पालक उपसंचालक कार्यालय तसेच मार्गदर्शन केंद्राच्या फेºया मारत असून त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसºया प्राधान्य फेरीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला. यातील शेवटच्या टप्प्यात पुनर्परीक्षा आणि एटीकेटी असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. मात्र या प्रवेशानंतर पुन्हा प्रवेश फेरी होणार का, ज्यांना या फेरीत प्रवेश मिळाले नाहीत त्यांचे काय, किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही सूचना सध्या संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत. बºयाच महाविद्यालयांना गणपतीची सुट्टी असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र अनेक अल्पसंख्याक महाविद्यालये सुरू आहेत. त्यामुळे पुढील प्रक्रिया केव्हा जाहीर करण्यात येईल, किमान यासंबंधी तरी शिक्षण विभागाने सूचना द्यायला हव्या होत्या असा सूर विद्यार्थी, पालकांत आहे.

...मगच उत्सव साजरे करा
दुसºया प्राधान्य फेरीनंतर प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरी राबविण्यात येईल, अशी शक्यता अधिकाºयांकडून वर्तविण्यात येत आहे. परंतु त्यासंबंधीच्या नियोजनाबद्दल मंत्रालय तसेच उपसंचालक कार्यालयातील अधिकारीही अनभिज्ञ आहेत. संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुणीही फोन उचलला नाही. अधिकारी गणेशोत्सवासाठी गावी गेल्यानेच प्रवेशासंबंधी पुढील सूचना जारी करण्यात आल्या नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधी प्रवेश प्रक्रियेसंबंधी स्पष्टता आणा, मगच उत्सव साजरे करा, अशी टीका पालक-विद्यार्थ्यांमधून होत आहे.

Web Title: There are no suggestions on the 11th entry process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.