निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:09 AM2024-05-22T09:09:30+5:302024-05-22T09:10:18+5:30

गेल्या वर्षी ८८.१३ टक्के असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५ टक्के आहे. 

The result has increased by 3.82 percent, but Mumbai remains at the bottom 91-95 percent result this year; Highest result of 96-35 percent in science stream | निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल

निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल

मुंबई  : इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा बारावीच्या निकाल सर्वांत तळाला असला तरी त्यामध्ये ३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ८८.१३ टक्के असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५ टक्के आहे. 

यंदा मुंबईतून  ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.३५ टक्के लागला, तर इतर शाखांमध्ये कला शाखेचा ८३.५६ टक्के, कॉमर्स शाखेचा निकाल ९०.८५ टक्के लागला. व्होकेशनलचा निकाल ९०.८५ आणि तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा ८६.१० टक्के इतका निकाल लागला.

रिपिटर्सच्या निकालात 
२० टक्क्यांची वाढ 
मुंबई विभागाचा रिपिटर्सचा निकाल ६३.३३ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या (४३.१७ टक्के) तुलनेत यात २० टक्क्यांनी भर पडली. एकूण ३३,०३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पुन्हा दिली होती. त्यापैकी २०,९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचा निकाल ६५.६५ टक्के, तर मुलांचा ६१.६५ टक्के लागला. 

शाखानिहाय परीक्षा दिलेले नियमित व उत्तीर्ण विद्यार्थी
    नियमित    उत्तीर्ण
विज्ञान    १,१७,२४९    १,१२,९७९
कला    ४०,४६०    ३३,८१२
कॉमर्स    १,५८,०४०    १,४३,६२८
व्होकेशनल    ३,२९०    २,९८९
तंत्रज्ञान विज्ञान    ८७१    ७५०

गुणवत्तेत वाढ
यंदा ४५,९७२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३८,६३४ होती. यंदा ८७,०५९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे, गेल्यावर्षी हा आकडा ७५,५९३ होता. द्वितीय श्रेणी यंदा १,१८,७८८विद्यार्थ्यांना आहे, गेल्या वर्षी ही संख्या १,२०,६९२ होती.

मुंबईचा गेल्या काही वर्षांतील निकाल (टक्क्यांत)
२०२४    ९१.९५  
२०२३    ८८.१३  
२०२२    ८९.७  

Web Title: The result has increased by 3.82 percent, but Mumbai remains at the bottom 91-95 percent result this year; Highest result of 96-35 percent in science stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.