‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:25 IST2026-04-17T08:25:22+5:302026-04-17T08:25:44+5:30

Mumbai High Court: चित्रपट ‘धुरंधर’ चे दिग्दर्शक आदित्य धर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मुंबई  उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही पक्षांना वाद मिटविण्याचा सल्ला दिला. धर यांनी  निर्माते संतोष कुमार यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

The 'Dhurandhar' dispute should be resolved amicably, | ‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना

‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना

मुंबई - चित्रपट ‘धुरंधर’ चे दिग्दर्शक आदित्य धर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मुंबई  उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही पक्षांना वाद मिटविण्याचा सल्ला दिला. धर यांनी  निर्माते संतोष कुमार यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. कुमार यांनी माध्यमांमध्ये धर यांच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर ‘प्लेजरिझम’ (साहित्यचौर्य) केल्याचा आरोप केला होता. न्या. अरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने  हा वाद अधिक वाढवू नये, तो सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना दिली. 

कुमार यांनी असा दावा केला आहे की ‘धुरंधर’ चित्रपटाची कथा ही त्यांच्या ‘डी साहेब’ या मूळ स्क्रीप्टची प्रत आहे. ८ एप्रिलला न्यायालयाने अंतरिम आदेश देत कुमार यांना धर यांच्याविरुद्ध  बदनामीकारक वक्तव्ये करण्यास मनाई केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने कुमार यांना सांगितले की, त्यांनी स्क्रीप्टवरील हक्कांबाबत योग्य न्यायालयात स्वतंत्र दिवाणी दावा दाखल करावा. त्यावर धर यांना उत्तर देण्याची संधी मिळेल. त्यामुळे मानहानीचा खटला प्रलंबित ठेवण्याऐवजी मूळ वाद त्या मार्गाने  सोडवावा.  

३० एप्रिलला पुढील सुनावणी
कुमार यांच्या वकिलांनी आपण योग्य दिवाणी कारवाई सुरू करण्याबाबत कुमार यांच्याकडून सूचना घेतील आणि पुढील तारखेला न्यायालयात माहिती देतील. न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले की, अशा प्रकरणांना मानहानीच्या खटल्यापर्यंत  नेण्याची गरज नसते. या याचिकेवर  पुढील सुनावणी ३० एप्रिलला होणार आहे.

‘स्क्रीप्ट कॉपी करून चित्रपट’
धर यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हाप्रदर्शित झाल्यानंतर कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दावा केला की त्यांनी २०२३ मध्ये स्क्रीन रायटर्स असोसिएशनकडे नोंदवलेल्या त्यांच्या ‘डी साहेब’ या स्क्रीप्टची नक्कल करून धर यांनी चित्रपट तयार केला. 

Web Title : 'धुरंधर' विवाद को सौहार्दपूर्ण ढंग से सुलझाएं: उच्च न्यायालय

Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट ने आदित्य धर और संतोष कुमार को 'धुरंधर' स्क्रिप्ट साहित्यिक चोरी विवाद को सौहार्दपूर्ण ढंग से निपटाने की सलाह दी। अदालत ने सुझाव दिया कि कुमार स्क्रिप्ट अधिकारों के संबंध में दीवानी दावा दायर करें। अगली सुनवाई 30 अप्रैल को है।

Web Title : Court urges 'Dhurandhar' parties to resolve dispute amicably.

Web Summary : Bombay High Court advised Aditya Dhar and Santosh Kumar to settle their 'Dhurandhar' script plagiarism dispute amicably. Court suggested Kumar pursue a civil claim regarding script rights, potentially resolving the matter outside the defamation suit. Next hearing is April 30.