एसटी तोट्याचा फटका एसटी कामगारांना; वेतनाच्या ५० टक्के पगार कमी देण्याचे नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:55 AM2020-02-01T02:55:27+5:302020-02-01T05:26:23+5:30

राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे.

ST loss hit ST workers; Planning to pay 3% salary reduction? | एसटी तोट्याचा फटका एसटी कामगारांना; वेतनाच्या ५० टक्के पगार कमी देण्याचे नियोजन?

एसटी तोट्याचा फटका एसटी कामगारांना; वेतनाच्या ५० टक्के पगार कमी देण्याचे नियोजन?

Next

मुंबई : एसटीला आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, प्रशासकीय कामगारांना संपूर्ण पगाराच्या ५० टक्के कमी पगार देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामगारांना आर्थिक झळ बसणार आहे.
राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नसल्याने महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे. इंधन, एसटीची देखभाल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत. २०१९-२० या काळात एसटीचा संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला आहे.
यासह इंधन दर आणि देखभालीचा खर्च वाढल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय कामगारांचा ५० टक्के पगार
कमी देण्याची योजना आखण्यात आली आहे.
डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे नाहीत. पैसे उभे करण्यासाठी महामंडळाकडून एसटी कर्मचाºयांच्या वेतनातून पगाराची कपात केली जात आहे. राज्यातील विविध एसटी आगारांमधील कर्मचाºयांच्या वेतनातून १० ते ४० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. यासह आता प्रशासकीय अधिकाºयांच्या वेतनातून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे. करण्यात येणाºया या कपातीमुळे त्यामुळे प्रशासकीय कामगारांना आर्थिक झळ बसणार आहे.

Web Title: ST loss hit ST workers; Planning to pay 3% salary reduction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.