...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:24 AM2020-01-22T10:24:14+5:302020-01-22T10:25:34+5:30

तसेच मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता.

... So there was no question of Congress taking up a proposal to establish a government - Shiv Sena | ...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

Next

मुंबई -  2014 सालात भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर 63 जागा घेतल्या. काँग्रेस 42 तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. म्हणजे विधानसभा त्रिशंकूच ठरली असं स्पष्टीकरण शिवसेनेने दिलं आहे. 

तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्ताधारी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी ‘आवाज’ नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असं सांगत शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. 

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. 2014 साली भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात ‘लॉजिक’ नावाचा प्रकार अजिबात नाही हे आधी मान्य केले पाहिजे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते असं शिवसेनेनं सांगितलं आहे. 

मुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस

दरम्यान, चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही, 2014 साली हे नाटय़ घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. मुखवटय़ाचे कारखाने भाजपकडेच होते. ‘लॉजिक’ म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी ‘आकडा’ जमत नव्हता असं स्पष्ट केलं आहे. 

मनसेच्या राजकारणाला मिळणार हिंदुत्वाची किनार; पक्षाचा नवा भगवा झेंडा 'असा' दिसणार

ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश

तसेच मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते व घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते असा आरोपही शिवसेनेनं भाजपावर केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआय मुलाखत देताना दावा केला होता की, 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेससमोर सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र आपण तो फेटाळला असं सांगितले. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले होते. विरोधी भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. 

Video : शाब्बास पठ्ठ्यांनो! 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

Web Title: ... So there was no question of Congress taking up a proposal to establish a government - Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.