दीदींची गाणी नेहमीच सोबत

By Admin | Updated: September 30, 2014 01:46 IST2014-09-30T01:46:23+5:302014-09-30T01:46:23+5:30

लतादीदी सात-आठ वर्षापूर्वी माङया वाढदिवसाला मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी माझी दृष्ट काढली होती. माङया आईला शुभेच्छा द्यायला आलो.

Sister songs always accompany | दीदींची गाणी नेहमीच सोबत

दीदींची गाणी नेहमीच सोबत

>सचिन तेंडुलकरचे उद्गार : आईला शुभेच्छा द्यायला आलो
मुंबई : लतादीदी सात-आठ वर्षापूर्वी माङया वाढदिवसाला मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी माझी दृष्ट काढली होती. माङया आईला शुभेच्छा द्यायला आलो. दीदींची गाणी नेहमीच माङयासोबत असतात. त्यांचे गाणो माङयासाठी नेहमीच प्रेरणादायी असते, असे उद्गार मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काढले.
हृदयेश आर्ट्सतर्फे षण्मुखानंद सभागृहात लता मंगेशकर यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आजारपणामुळे लता मंगशेकर उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने उषा मंगेशकर यांनी सचिनच्या हस्ते सत्कार स्विकारला. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, अंजली तेंडुलकर, ठाणो मनपाचे आयुक्त असीम गुप्ता आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
प्रकृतीच्या तक्रारीमुळे अनुपस्थित राहिलेल्या लतादीदींनी याप्रसंगी फोनवरून उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सर्वाना माझा नमस्कार. आज जरा बरं वाटत नाही, त्यामुळे यायला जमलं नाही. हृदयनाथच्या संगीत क्षेत्रतील कारकिर्दीला 6क् वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला यायची माझी मनापासून इच्छा होती. पण आजारी असल्यामुळे ते जमले नाही. मी आपल्या सगळ्य़ांची क्षमा मागते. या समारंभादरम्यान, सचिन आणि अंजलीचा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्वरभारतीतर्फे ‘चाला वाही देस’ हा सांगीतिक कार्यक्रमही सादर झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Sister songs always accompany