Join us  

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 9:02 PM

मध्य आणि पश्चिम रेल्वेनी १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली. यासाठी जादा रेल्वे कर्मचारी कामावर हजर राहू लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या बेस्ट आणि एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील होत आहे. रेल्वेचे तिकीट तपासनीस, बुकिंग क्लार्क, आरपीएफ, वर्कशॉप आणि कारशेडमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची वाढ लोकलच्या वेगप्रमाणे होत आहे. आतापर्यंत रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या आणि कोरोनाबाधित अशा १ हजार ३०२ रुग्णांवर उपचार करण्यात आला. तर, यापैकीच १३५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

मध्य आणि पश्चिम रेल्वेनी १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली. यासाठी जादा रेल्वे कर्मचारी कामावर हजर राहू लागले. मात्र आता रेल्वे कर्मचार्‍यांना  कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. 

मध्य रेल्वेच्या ७२०, पश्चिम रेल्वेच्या ४८७ रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना  कोरोनाची लागण झाली होती. तर  ९५ रुग्ण संख्या मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांची आहे. त्याच्यावर पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या पश्चिम रेल्वेच्या ३७, मध्य रेल्वेच्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, अन्य ३ नागरिकांवर जगजीवन राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

कुटुंबियांनाती लागण

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना देखील कोरोनाची लागण कोरोनाचे संक्रमण वेगात सुरु आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुबियांना देखील याची बाधा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ३५० रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ३७० कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पश्चिम रेल्वे मधील २७६  रेल्वे कर्मचाऱ्यांच्या २११ कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचार्यांना कोरोनाचे भय सतावत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकभारतीय रेल्वे