दसरा मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांची मोदी आणि भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 18:45 IST2018-10-18T18:44:15+5:302018-10-18T18:45:02+5:30
आज रात्री होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दसरा मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांची मोदी आणि भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी
मुंबई - आज रात्री होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला मित्रपक्ष भाजपासोबत ताणलेले संबंध, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा, राफेल विमान करार अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांचे आगमन होऊ लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील रोष शिवसैनिक व्यक्त करत आहेत. सरकारच्या धोरणांवर नाराज असलेल्या शिवसैनिकांकडून मोदी, फडणवीस यांच्याबरोबरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.