Join us

Rajasthan Political Crisis: राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार?; संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 15:05 IST

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई:  राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. (Rajasthan Political Crisis)

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार नाही. कोरोनाच्या संकटात अशा कोणत्याही प्रकारच राजकारण करण्याची गरज नाही. राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राजकारणातील कसलेले पैलवान आहेत, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. 

सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट आणि अन्या आमदारांसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सचिन पायलट यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळे सचिन पायलट यांनी फोन करुन ते बैठकीत कधीपर्यत सहभागी होऊ शकतात हे सांगाव, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  

राजस्थान वैयक्तिक स्पर्धेपेक्षा मोठा असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. त्यामुळे सचिन पायलट यांची सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत पुढे चर्चा होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश

Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियनला बलात्काराची धमकी, आरोपीला अटक

टॅग्स :सचिन पायलटअशोक गहलोतराजस्थानसंजय राऊतकाँग्रेस