cybercrime cell registerd an fir againt shubham mishra for abusing a stand up comedian girl | छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियनला बलात्काराची धमकी, आरोपीला अटक

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियनला बलात्काराची धमकी, आरोपीला अटक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन तरुणीने केलेल्या विनोदामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर त्या संबंधित तरुणीने सोशल मीडियावर यासंबंधी माफीही मागितली. मात्र तरीही तिच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त कमेन्ट केल्या जात आहेत. या सर्वाचाच प्रकार म्हणजे एका तरुणने सोशल मीडियावरुन आता तिला थेट बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तरुणाच्या या धमकीनंतर त्याविरोधात सर्वांनीच संताप व्यक्त केला आहे.

गुजरातमधील वडोदरा शहरात राहणाऱ्या शुभम मिश्रा नावाच्या तरुणाने युट्यूबवरुन संबंधित तरुणीला बलात्काराची धमकी दिली. यानंतर शुभम मिश्राविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. वडोदरा पोलिसांनी शुभम मिश्राला अटक केल्याचंही सांगितलं. आरोपीविरोधात कलम २९४, ३५४ (अ) ५०४, ५०५, ५०६, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

तत्पूर्वी, शिवाजी महाराजांवरील टिकेबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित तरुणीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर संबंधित तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्वांनी जाहीर माफी मागितली. यानंतर शुभम मिश्राने एक व्हिडिओ बनवत संबंधित तरुणीला अश्लिल शब्दात शिवीगाळ केली आणि बलात्कार करण्याची धमकी दिली.  यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरासारखे अनेक जणांनी शुभम मिश्राविरोधात आवाज उठवला. तसेच पोलिसांनी लवकरात लवकरत शुभम मिश्राला अटक करण्याची मागणी केली होती. 

शुभम मिश्रा हा एक युट्यूबर आहे. स्टँड-अप कॉमेडियन तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं म्हणत तिच्याविरोधाक एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये त्याने अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. याचमुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही झाला.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश

Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

Read in English

Web Title: cybercrime cell registerd an fir againt shubham mishra for abusing a stand up comedian girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.