Uddhav Thackeray: “नितीश कुमार-तेजस्वी यादव बिहारला नक्कीच प्रगतीपथावर नेतील”; उद्धव ठाकरेंच्या मनःपूर्वक शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:04 PM2022-08-13T15:04:36+5:302022-08-13T15:04:45+5:30

Uddhav Thackeray: भाजपला दूर करत नवे सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेचच नितीश कुमार आणि तेजस्वी यादवांना फोन करून संवाद साधला.

shiv sena chief uddhav thackeray made call to nitish kumar and tejashwi yadav after formation of new govt without bjp | Uddhav Thackeray: “नितीश कुमार-तेजस्वी यादव बिहारला नक्कीच प्रगतीपथावर नेतील”; उद्धव ठाकरेंच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Uddhav Thackeray: “नितीश कुमार-तेजस्वी यादव बिहारला नक्कीच प्रगतीपथावर नेतील”; उद्धव ठाकरेंच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Next

मुंबई: आताच्या घडीला देशातील राज्यांमध्ये एकामागून एक राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जोरदार धक्का देत नितीश कुमारांनी (Nitish Kumar) एनडीएतून बाहेर पडत तेजस्वी यादवांसह (Tejashwi Yadav) नवे सरकार स्थापन केले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यांना फोन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर जदयू आणि राजद यांच्यासह मित्र पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी भाजपचा जदयूला फोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा दावाही विरोधी पक्ष सातत्याने करताना पाहायला मिळत आहे. यातच बिहारमधील नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

यासंदर्भात खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विटवरून याची माहिती दिली आहे. बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि जदयू हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये कार्यरत होते. शिवसेना आणि जदयूने भाजपची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. शिवसेनेने २०१९ मध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला धोका दिला त्यामुळं आम्ही त्यांचा पक्ष फोडला, असे केंद्रीय मंत्री सुशील मोदी म्हणाले. शिवसेनेसोबत जे घडले ते जदयूसोबत घडेल, असा इशाराही सुशील मोदी यांनी दिला होता. शिवसेना आणि जदयू आता भाजपच्या विरोधात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: shiv sena chief uddhav thackeray made call to nitish kumar and tejashwi yadav after formation of new govt without bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.