Join us

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:04 IST

shefali Jariwala Last X Post: ‘कांटा लगा’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले.

Shefali Jariwala Death: ‘कांटा लगा’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेफालीच्या मृत्युची बातमी दिली. शेफालीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या शेफालीने तिच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेली शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यात तिने बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याच्या नावाचा उल्लेख केला आहे, ज्याला ती काही वर्षांपूर्वी डेट करत होती.

रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा २०२१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या श्राद्ध विधीनिमित्त शेफाली जरीवालाने सिद्धार्थ शुक्लासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना मीठी मारताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'आज तुझी आठवण येतेय माझ्या मित्रा', असे लिहिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानतंर तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच तिच्या मृत्युचे खरे कारण समोर येईल. 

टॅग्स :शेफाली जरीवालामुंबईबॉलिवूडमृत्यूबिग बॉसहृदयविकाराचा झटकाट्विटरसोशल मीडिया