मोदींकडे बोलण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते हिंदुत्वाकडे वळले, शरद पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:34 IST2019-04-09T20:33:28+5:302019-04-09T20:34:51+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.

Sharad Pawar attack on PM Narendra Modi | मोदींकडे बोलण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते हिंदुत्वाकडे वळले, शरद पवारांचा टोला

मोदींकडे बोलण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते हिंदुत्वाकडे वळले, शरद पवारांचा टोला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. पाच वर्षांमध्ये काहीच विकास करता न आल्याने मोदींकडे बोलण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते हिंदुत्वाचे नाव घेत काँग्रेसवर हल्ला चढवत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. 

 ''पाच वर्षांपूर्वी सतत विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यापासून हिंदू, दहशतवादी आदी मुद्द्यांवर बोलण्यास सुरुवात केली आहे.  पाच वर्षांत काहीच विकास साध्य न केल्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर काँग्रेसवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.'' असे पवार म्हणाले. 

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या गिरगाव येथील अलंकार सिनेमागृह जवळील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर संवाद साधताना शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली. आजच्या घडीला देशात परिवर्तनाची आवश्यकता आहे, त्यामुळे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.  

Web Title: Sharad Pawar attack on PM Narendra Modi