समीर खानला आज न्यायालयात हजर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:06 IST2021-01-18T04:06:53+5:302021-01-18T04:06:53+5:30

तस्कर सजनानी कनेक्शन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ खरेदीप्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई ...

Sameer Khan will be produced in court today | समीर खानला आज न्यायालयात हजर करणार

समीर खानला आज न्यायालयात हजर करणार

तस्कर सजनानी कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ खरेदीप्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचे जावई समीर खान याच्या एनसीबी कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. ड्रग्जसाठी त्याचे परदेशी कनेक्शन व त्यातील अन्य संबंधितांचा तपास बाकी असल्याने न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मुदत वाढवून मागण्यात येणार असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात एनसीबीने परदेशी ड्रग्ज तस्कर करण सजनानीला अटक करून २०० किलो परदेशी गांजा जप्त केला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून समीर खानचे नाव समोर आल्याने त्याला बुधवारी रात्री अटक केली. त्यानंतर त्याच्या वांद्रेतील घरी व कार्यालयात छापे टाकले होते. त्याचे बँक व अन्य आर्थिक व्यवहाराबाबतची दस्तऐवज, कागदपत्रे तसेच त्याचे लॅपटॉप मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याचा सविस्तर तपास करण्यासाठी समीर खानची कोठडीची मुदत वाढविण्याबाबत न्यायालयाकडे विनंती केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Sameer Khan will be produced in court today