'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 05:59 PM2020-01-13T17:59:31+5:302020-01-13T18:05:53+5:30

भाजपा आणि मनसेप्रमुख राज ठाकरेंची जवळीक वाढत असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Samajwadi Party leader Abu Azmi has criticized MNS chief Raj Thackeray | 'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका'

'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका'

Next

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजपा आणि मनसेप्रमुख राज ठाकरेंची जवळीक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी  राज ठाकरेंवर निशाणा साधल आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मिमिक्री करुन भाजपावर टीका केली होती. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी त्याच भाजपासोबत जाणं योग्य नसल्याचे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्या घराण्याचा तरी सन्मान ठेवा आणि भाजपासमोर गुडघे टेकू नका असा सल्ला अबू आझमी यांनी राज ठाकरेंना दिला आहे. त्याचप्रमाणे वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही अशी टीका देखील अबू आझमींनी राज ठाकरेवर केली आहे. 

'नरेंद्र मोदींचं राज ठाकरेंनी जेवढं कौतुक केलं तेवढं कोणीही केलं नाही'

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.

...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

...अन् अखेर स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितली मनसेबाबत 'राज की बात'

Web Title: Samajwadi Party leader Abu Azmi has criticized MNS chief Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.