निवडणूक वर्षात रस्त्यांची कामे सुसाट; कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:01 AM2021-02-04T08:01:26+5:302021-02-04T08:01:53+5:30

Mumbai News : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपये, तर गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यासाठीही १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Road works smooth in election year; Two thousand crore for Coastal Road | निवडणूक वर्षात रस्त्यांची कामे सुसाट; कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी

निवडणूक वर्षात रस्त्यांची कामे सुसाट; कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपये, तर गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यासाठीही १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  काँक्रिटच्या रस्त्यांवर भर दिला आहे. १५७ किमी रस्त्यांची दुरुस्ती हाेईल. त्यातील १४५ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाेईल. यासाठी १६०० कोटींची तरतूद केली आहे. तसेच सार्वजनिक वाहनतळांसाठी विभाग पातळीवर व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
नरीमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा सागरी किनारी मार्ग २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. वाहनतळ नियोजनासाठी वाहनतळ प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. यानुसार जीआयएस मॅपिंग करून विभागनिहाय आराखडा तयार करण्यात येईल. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर वाहनतळांच्या विकासासाठी करण्यात येईल. पदपथ चालण्यायोग्य बनविणे व त्यांचे सौंदर्यीकरण हाेईल. यासाठी १६० किमीचे १४९ पदपथ तयार करण्यात येतील. तसेच १२८ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. 
पुलांची डागडुजी
२१ धोकादायक पूल पाडून पुनर्बांधणी, ४७ पुलांच्या मोठ्या, तर १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या हाती घेतल्या आहेत. यापैकी ६० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला. शहरातील ३४४ पैकी ४२ पुलांखाली नागरिकांना सुविधा उपलब्ध हाेतील. काही पुलांखाली हॉकी स्टेडियम, उद्यान तयार करण्यात येतील.
 प्रकल्पा 

 

Web Title: Road works smooth in election year; Two thousand crore for Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.