नदीप्रदूषणाचा फटका

By Admin | Updated: November 30, 2014 01:47 IST2014-11-30T01:47:36+5:302014-11-30T01:47:36+5:30

शहरातील वालधुनी नदीतील उग्र दर्पाने सकाळी 4च्या सुमारास नदी किना:यानजीक राहणा:या 378 जणांना उलटय़ा, मळमळणो, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला.

River pollution | नदीप्रदूषणाचा फटका

नदीप्रदूषणाचा फटका

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीतील उग्र दर्पाने सकाळी 4च्या सुमारास नदी किना:यानजीक राहणा:या 378 जणांना उलटय़ा, मळमळणो, श्वास घेण्यास त्रस होणो, पोट दुखणो, चक्कर येणो आदी त्रस झाला.  याप्रकाराने सम्राट अशोकनगर, वडोल गाव, रेणुका सोसायटी परिसरातील शेकडो नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने रुग्णालय 
गाठले.
उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणा:या वालधुनी नदीच्या पात्रत केमिकल कारखान्यांसह जीन्सच्या कारखान्यांतील व शहरातील सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे नदी अतिशय प्रदूषित झाली आहे.  शनिवारी सकाळी नदी पात्रतील उग्र दर्पाने  काठावर राहणा:या शेकडो जणांना त्रस झाला. त्यामुळे अनेकांनी मध्यवर्ती रुग्णालयासह खासगी रुग्णालयात धाव घेतली. वायू बाधेची माहिती आमदार ज्योती कालानी, उपमहापौर पंचशिला पवार, राजू तेलकर, रामेश्वर गवई, महादेव सोनावणो, बबन गटे यांना मिळाल्यावर त्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात व वायुबाधित परिसरात धाव घेतली. प्रमोद शिंदे, सतीश सावंत यांनी मोफत रुग्णवाहिका पुरविली. वालधुनी नदीतील विषारी दर्पाचा त्रस कमी अधिक प्रमाणात नेहमीच होत असल्याचे स्थानिक नगरसेविका व उपमहापौर पंचशिला पवार यांनी सांगितले. यापूर्वीही नदीत विषारी रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.  शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी प्रदूषणास कारणीभूत टँकर  पकडून देऊन पालिकेला कारवाई करण्यास भाग पाडले होते.  खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त बालाजी खतगावकर, महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशिला पवार, स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी, सभागृह नेता धनंजय बोडारे यांनी परिसराचा दौरा करून रुग्णांची विचारपूस केली आहे. (प्रतिनिधी)
 
मध्यवर्ती रुग्णालयात-195, शिवनेरी रुग्णालय-83, सर्वानंद रुग्णालय-74, कामगार रुग्णालयात-21 तर त्रिमूर्ती रुग्णालयात-5 अशा एकूण 378 जणांवर उपचार करण्यात आले. दुपारनंतर अनेकांना घरी पाठविण्यात आले, अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. राजा रिजवानी व मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी दिली आहे.  

 

Web Title: River pollution