दूषित पाण्याने रहिवासी आजारी

By Admin | Updated: March 14, 2015 01:28 IST2015-03-14T01:28:34+5:302015-03-14T01:28:34+5:30

मलवाहिन्यांतून नळाचे पाइप टाकल्यामुळे पाचपाखाडीतील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे.

Residents sick with contaminated water | दूषित पाण्याने रहिवासी आजारी

दूषित पाण्याने रहिवासी आजारी

घोडबंदर : मलवाहिन्यांतून नळाचे पाइप टाकल्यामुळे पाचपाखाडीतील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. यामुळे अनेक जण आजारी पडल्याने स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी स्थायी समितीत प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. त्यांनी गढूळ पाणी सभेत पुरावा म्हणून आणून पिण्याचा आग्रह अधिकाऱ्यांना धरला़
गेल्या महिनाभरापासून नामदेववाडी, टेकडी बंगला परिसरातील लोकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी प्यायल्याने अनेक जणांना पोटाचे विकार, जुलाब, उलट्या असे आजार जडले आहेत़ अनेक जण दवाखान्यात उपचार घेत असल्याचे त्यांनी सभेच्या निदर्शनास आणले. याबाबत पाणीखात्याचे अधिकारी व नगर अभियंता यांना तक्र ार केली, मात्र अद्याप दूषित पाणीपुरवठा बंद झालेला नाही. तुम्ही लोकांना जे पाणी प्यायला देता, ते तुम्ही पिऊन दाखवा, असे म्हणून दूषित पाण्याची बाटली सभेत दाखवून त्यात जंतू असल्याचे दाखवले. ही चर्चा सुरू असताना नगरसेवकांमध्येच तू-तू मैं-मैं झाली. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी हस्तक्षेप करून चर्चेला पुन्हा वाट मोकळी करून दिली.

Web Title: Residents sick with contaminated water