चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

By संतोष आंधळे | Published: May 18, 2024 08:45 AM2024-05-18T08:45:04+5:302024-05-18T08:46:18+5:30

अनेक जण आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. 

rehabilitation of chalis huts is a key issue who has the influence in the elite areas to the middle class marathi areas | चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून त्यामध्ये वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात देशातील श्रीमंत उद्योगपतींपासून ते श्रमिक सर्व स्तरांतील नागरिक राहतात. या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारती असून, जुन्या नागरी वसाहती त्यासोबत काही चिंचोळ्या गल्लीबोळांत मोठ्या प्रमाणात इमारती असून त्यांचे पुनर्वसन अनेक दिवसांपासून रखडले आहे. या भागात झोपडपट्ट्या असून  झोपडपट्टी पुनर्वसन योजना अर्धवट आहे. अनेक जण आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. 

या भागात दिवसभर मुंबई महानगर प्रदेशातून नोकरदार कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे दिवसभर या परिसरात सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या परिसरात राहणाऱ्या लोकांचा पार्किंगचा प्रश्न बिकट झाला आहे. या परिसरात अनेकवेळा पार्किंगवरून नागरिकांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र नियमितपणे पाहायला मिळते. तसेच बहुतांश नागरिक या परिसरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांवर अवलंबून आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये अनेकवेळा मोफत मिळणाऱ्या औषधांसाठी नागरिकांना पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे आराेग्यावरही अतिरिक्त खर्च होतो, असे लोकांचे म्हणणे आहे.

गटा-तटाचे काय? 

भाजपने मतदार संघावर सुरुवातीपासूनच दावा केला होता. पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांनी कामही सुरू केले होते. मात्र, भाजप उमेदवाराला तिकीट न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, नंतर संपूर्ण प्रचाराची धुरा मंगलप्रभात लोढा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे.

निवडणुकीतील मुख्य मुद्दे

मलबार हिलमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे.
-मुंबादेवी सेस इमारतीच्या पुनर्वसनात अडथळे असून विशेषकरून भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये वाद आहेत. त्यामुळे काम पुढे सरकत नाही. गेली अनेक वर्षे इमारतींची डागडुजी करून नागरिक राहत आहे.
- संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सुविधा बिकट झाली आहे.
- सीआरझेडमुळे वरळी आणि कुलाबा कोळीवाड्याचा विकास रखडला आहे.    

२०१९ मध्ये काय घडले ?

उमेदवार    पक्ष     प्राप्त मते
अरविंद सावंत    शिवसेना    ४,२१,९३७
मिलिंद देवरा    काँग्रेस    ३,२१,८७०
नोटा    -    १५,११५ 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के
२०१४    अरविंद सावंत    शिवसेना    ३,७४,६०९    ४८.०४
२००९    मिलिंद देवरा     काँग्रेस    २,७२,४११    ४२.४६
२००४    मिलिंद देवरा    काँग्रेस    १,३७,९५६    ५०.२८
१९९९    जयवंतीबेन मेहता    भाजप    १,४४,९४५    ४७.८४


 

Web Title: rehabilitation of chalis huts is a key issue who has the influence in the elite areas to the middle class marathi areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.