दिंडोशीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 21, 2015 02:07 IST2015-07-21T02:07:03+5:302015-07-21T02:07:03+5:30

गोरेगाव पूर्व परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला रविवारी अटक केली

Rape of Dindoshi minor girl | दिंडोशीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिंडोशीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई : गोरेगाव पूर्व परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला रविवारी अटक केली. त्याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव पूर्वच्या दिंडोशी परिसरात आरोपी आणि पीडित मुलगी राहतात. ते दोघेही एकमेकांना ओळखतात. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही मुलगी बाहेरून जाऊन येते, असे सांगून घरातून निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला शोधण्यास सुरुवात केली. तिच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे देखील चौकशी केली, मात्र ती कुठेच सापडली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा तिने तिच्या घरच्यांना फोन करून तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानुसार तिच्या घरच्यांनी तिने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन तिला घरी आणले आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आम्ही संबंधित आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of Dindoshi minor girl