महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:55 AM2024-05-18T05:55:10+5:302024-05-18T05:56:49+5:30

उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला; पण ४  तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला...’ असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

ramdas athawale criticized maha vikas aghadi in shivaji park rally for lok sabha election 2024 | महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले

महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे... कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे... काँग्रेस-राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे... मग, तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे... उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला; पण ४  तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला...’ असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पंतप्रधान बनायचे आहे. तिकडे जाऊन कसे बनणार तुम्ही? कोण बनवणार तुम्हाला पंतप्रधान? बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले, मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात, असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, संविधान धोक्यात नाही, तर महाविकास आघाडीसोबत तुम्ही धोक्यात आहात, अशी टीकाही आठवले यांनी केली.


 

Web Title: ramdas athawale criticized maha vikas aghadi in shivaji park rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.