Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:18 IST2025-07-05T10:22:50+5:302025-07-05T13:18:49+5:30

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally Live Update : वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले आहेत. 

Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update After Thackeray cousins reunite for ‘victory’ rally after Maharashtra govt’s U-turn on Hindi policy | Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha LIVE Updates: : वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले आहेत. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. विरोधामुळे सरकारने आपल्या आदेशावर 'यू-टर्न' घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला. सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.

LIVE

Get Latest Updates

05 Jul, 25 : 01:12 PM

05 Jul, 25 : 01:08 PM

मराठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी उभं राहणारच - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 01:01 PM

हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:56 PM

पालख्यांचे भोई होणार की माय मराठीला पालखीमध्ये बसवणार? - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:54 PM

म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:52 PM

दिल्लीत बसलेल्या मालकांचे बूट चाटण्यासाठी आमचं सरकार पाडलं - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:52 PM

मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि करणारच - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:47 PM

आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:47 PM

भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे 

05 Jul, 25 : 12:46 PM


 

05 Jul, 25 : 12:41 PM

एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:39 PM

आज आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:38 PM

बऱ्याच वर्षांनी दोघांची भेट व्यासपीठावर झाली आहे - उद्धव ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:34 PM

मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:32 PM

आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:31 PM

विनाकारण आणलेला विषय होता... उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहात. खरं तर आणली पाहिजे. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास.. हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्या प्रगत... आणि आम्ही हिंदी शिकायची... - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:29 PM

एक पत्र दिलं, दोन पत्रं दिली. दादा भुसे माझ्याकडे आले... काय म्हणतो ऐकून तर घ्या. तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आणलं हो... केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी हे सूत्र आणलं... हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात इंग्रजीत सगळ्या गोष्टी होतात. केंद्राच्या शिक्षण धोरणातही नाही. इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेची राज्यं हिंग लावून विचारत नाहीत यांना.. महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठतो, त्यावेळी काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:26 PM

तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
 

05 Jul, 25 : 12:25 PM

माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:21 PM

महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना कळलं असेल - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:18 PM

कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:13 PM

कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणालाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:11 PM

आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
 

05 Jul, 25 : 12:08 PM

05 Jul, 25 : 12:00 PM

ठाकरे सभास्थळी दाखल

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल

05 Jul, 25 : 11:52 AM

हा एक ऐतिहासिक क्षण - अरविंद सावंत


 

05 Jul, 25 : 11:44 AM

'जय जवान'नं मराठी प्रेमासाठी दिली सलामी

05 Jul, 25 : 11:41 AM

ठाकरेंचा मराठी विजयी मेळावा; अभिनेत्री चिन्मयी सुमित काय म्हणाल्या?


 

05 Jul, 25 : 11:37 AM

तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?

05 Jul, 25 : 11:35 AM

"मराठीपण जपायला हवं"

आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होतोय ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतोय. मराठी माणसाने जगायला हवं. मराठीपण जपायला हवं. असं नाही की हिंदीच्या विरोधात  आहे. पण हिंदी सक्तीची नसावी याच विरोधात आपण होतो - भरत जाधव 
 

05 Jul, 25 : 11:30 AM

"अजून मराठी माणसाने एकत्र येणं बाकी आहे"

मराठीसाठीच आलेलो आहोत आम्ही. मराठी भाषेचा जो विजय झालाय जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलीय त्यासाठी आलो आहोत. जी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे त्यासाठीच आलेलो आहोत. अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसाने एकत्र येणं बाकी आहे. मराठी मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत - तेजस्विनी पंडित 
 

05 Jul, 25 : 11:21 AM

या दोन्ही नेत्यांना एकत्र बघणं ही गोष्ट आपल्याला खूप उत्सुक करणार आहे. हा अनुभव आणि ती एनर्जी  छान आहे तीच अनुभवण्यासाठी आलोय. याच गोष्टीची वाट बघतोय मराठी माणूस. आज फक्त ऐकायचंय साहेबांना - सिद्धार्थ जाधव 
 

05 Jul, 25 : 11:18 AM

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल

विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस एकवटला आहे. त्यानिमित्ताने या मेळाव्यात मराठी कलाकार सुद्धा सहभागी झाले आहेत. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव याशिवाय अभिनेत्री चिन्मयी सुमीत, तेजस्विनी पंडित यांनी भावना व्यक्त केल्या. 

05 Jul, 25 : 11:18 AM

गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले

वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ

05 Jul, 25 : 11:17 AM

कोणताही राजकीय अजेंडा नाही - मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे


 

05 Jul, 25 : 11:03 AM

नेते प्रवेशद्वारावरच अडकले

वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी, आतमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
 

05 Jul, 25 : 10:56 AM

ठाकरे बंधुंचा मराठी विजय मेळावा; दोन्ही पक्षांचे नेते किती उत्सुक?


 

05 Jul, 25 : 10:44 AM

ठाकरे बंधुंच्या मराठी प्रेमासाठी 'जय जवान'ची ७ थरांची सलामी!


 

05 Jul, 25 : 10:32 AM

ठाकरे बंधुंच्या मेळाव्यासाठी थेट अमेरिकेहून आला मराठी भाषेचा चाहता


 

05 Jul, 25 : 10:27 AM

महाराष्ट्रद्रोहीला चाबकाचे फटके, वरळी डोम बाहेर महाराष्ट्र प्रेमी एकवटले


 

05 Jul, 25 : 10:25 AM

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!


 

05 Jul, 25 : 10:25 AM

'आवाज मराठीचा'

विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून स्वत:चा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये संदीप देशपांडेंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. या टी-शर्टच्या उजव्या बाजुला महाराष्ट्राचा नकाशा आणि डाव्या बाजूला 'आवाज मराठीचा', असा मजकूर लिहिले आहे. तर, समोर बाराखडी लिहिलेली आहे.
 

05 Jul, 25 : 10:25 AM

कोणताही 'झेंडा' नाही

शिवसेना 'उबाठा' गटाचे नेते अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीत ५० हजार ते १ लाख लोक एकत्र येतील, अशी शक्यता आहे. ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येत असले तरी, येत्या निवडणुकीत ते एकत्र राहतील का, हा निर्णय दोन्ही भावांवर अवलंबून आहे, असेही सावंत यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी कोणतेही पक्षीय झेंडे, बॅनर, निवडणूक चिन्ह, होर्डिंग्ज वापरायचे नाहीत, असे ठरवले आहे.
 

05 Jul, 25 : 10:24 AM

विजय मेळावा कुठे होणार?

ठाकरे बंधूंचा हा 'विजयी मेळावा' वरळीतील एनएससीआय डोम येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला गेला आहे, तो परिसर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.

Web Title: Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update After Thackeray cousins reunite for ‘victory’ rally after Maharashtra govt’s U-turn on Hindi policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.