'व्हॅलेंटाइन'च्या महिन्यातच ठरली राहुल गांधींची 'मिठी योजना'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 04:10 PM2018-07-25T16:10:04+5:302018-07-25T16:15:06+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. लोसभेतील अविश्वास प्रस्तावेळीच्या भाषनानंतरची राहुल यांची 'जादू की झप्पी' देशभर चर्चेचा विषय ठरली. पण,

Rahul Gandhi's planned in the month of 'valentine' to hug PM modi | 'व्हॅलेंटाइन'च्या महिन्यातच ठरली राहुल गांधींची 'मिठी योजना'

'व्हॅलेंटाइन'च्या महिन्यातच ठरली राहुल गांधींची 'मिठी योजना'

Next

मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. लोसभेतील अविश्वास प्रस्तावेळीच्या भाषनानंतरची राहुल यांची 'जादू की झप्पी' देशभर चर्चेचा विषय ठरली. मात्र, राहुल गांधी मोदींना गळाभेट देणार हे 5 महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यासाठी व्हॅलेंटाइन महिन्यापासून मोदींना गळाभेट करण्याची संधीच राहुल गांधी शोधत होते, अशी माहिती काँग्रेस नेत्यानेच दिली आहे. 

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणातून राहुल गांधींना स्वत: आणि गांधी कुटुंबीयांबद्दल तिरस्कार जाणवला होता. मोदी हे द्वेषाने पछाडले आहेत, असे राहुल यांना वाटत होते. त्यामुळेच सर्वांसमक्ष मोदींना जादू की झप्पी देण्याच्या विचारात राहुल गांधी होते. ज्यामुळे मोदी हे तिरस्कार करणारे असून राहुल हे प्रेमाचा आणि सौहार्दतेचा संदेश देणार नेते आहेत, अशी प्रतिमा त्यांची तयार होणार होती. राहुल गांधीची ही गळाभेट म्हणजे एक राजकीय खेळी होती, त्यासाठी फ्रेब्रुवारीपासून राहुल गांधी वाट पहात होते. पण, लोकसभेतील भाषणानंतर त्यांना ही संधी मिळाली. त्यामुळे राहुल यांनी भर संसदेत पंतप्रधान मोदींना मिठी मारली, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. या भेटीनंतर देशभरात चर्चा सुरु झाली. तर नेटीझन्सनेही यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राहुल यांच्या या मिठी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. तर अनेक काँग्रेस नेत्यांनी या गळाभेटीची खासगीत चेष्टाही केली. 

Web Title: Rahul Gandhi's planned in the month of 'valentine' to hug PM modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.