मुंबईचा प्रशांत मोरे कॅरमचा नवा विश्वविजेता

By Admin | Updated: November 16, 2016 22:54 IST2016-11-16T22:24:45+5:302016-11-16T22:54:06+5:30

इंग्लंड येथील बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्याच रियाझ अली अकबरवर मात करत मुंबईचा प्रशांत मोरे कॅरमचा नवा विश्वविजेता ठरला आहे.

Prashant More of Mumbai's new world champion | मुंबईचा प्रशांत मोरे कॅरमचा नवा विश्वविजेता

मुंबईचा प्रशांत मोरे कॅरमचा नवा विश्वविजेता

ऑनलाइन लोकमत

बर्मिंगहॅम, दि. १६ - इंग्लंड येथील बर्मिंगहॅममध्ये झालेल्या कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्याच रियाझ अली अकबरवर मात करत मुंबईचा प्रशांत मोरे कॅरमचा नवा विश्वविजेता ठरला आहे.
कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात प्रशांत मोरेने भारताच्या रियाझ अली अकबरवर 25-22, 10-25, 25-12 अशी मात करून विश्वविजेतेपद मिळविलं. विश्वविजेतेपद पटकावणारा प्रशांत महाराष्ट्राचा दुसरा तर मुंबईचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी पुण्याच्या योगेश परदेशीने कॅरमच्या विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता.
याचबरोबर पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि महिला सांघिक या गटांमध्येही भारतीय खेळाडूंनीच विश्वविजेतेपदावर आपला ठसा उमठविला आहे. तसेच, महाराष्ट्राचा संदीप देवरुखकर आणि रियाझ अकबर अली ही जोडी या स्पर्धेतील पुरुष दुहेरीत विश्वविजेती ठरली. 

Web Title: Prashant More of Mumbai's new world champion