'Pistularao Mahajan, Dhananjay Munde' heavy critics on girish mahajan and sadabhau khot | 'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटला

'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना, मुंडेंनी एकेरी शब्दात उल्लेख केला. तसेच, गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करताना पिस्तुलराव महाजन अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. 

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी पैठण येथून सुरूवात झाली. त्यावेळी, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, महापूराच संदर्भ देत सरकार पूरग्रस्तांसाठी किती असंवेदनशील असल्याचंही राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यातच, भोकरदन येथील सभेत बोलताना, धनंजय मुंडेंनी एकेरी भाषेत मंत्र्यांचा समाचार घेतला. गिरीश महाजन आणि सदाभाऊ खोत यांच्या व्हायरल व्हीडिओवरुन मुंडेंनी दोघांवर निशाणा साधत मड्यावरचं लोणी खाणारी ही लोकं असल्याचं त्यांनी म्हटलं. ''ते पिस्तुलराव महाजन, तुम्ही पाहिलं असेल? पूराच्या गावात सेल्फी काढतायेत, मग जोड्यानं नाही हाणलं पाहिजे का त्याला? एक सेल्फी काढतोय? तर, दुसरा सदा खोत, त्यानं तर बोटेत माणूस घेतला टीव्ही चॅनेलवाला. उगाच इकडून तिकडं बोट घेऊन जातोय, असे म्हणत मुंडेंनी सत्ताधारी मंत्र्यांवर जोरदार टीका केली. 
 

Web Title: 'Pistularao Mahajan, Dhananjay Munde' heavy critics on girish mahajan and sadabhau khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.