मुंबई : मेट्रो 7 चं काम सुरु असताना कोसळला पिलर, एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:00 IST2017-10-21T16:23:49+5:302017-10-25T15:00:12+5:30
मेट्रो 7 चं बांधकाम सुरू असताना पिलर कोसळला. गोरेगावमधील ही घटना आहे. या घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. मोठी दुर्घटना टळल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मेट्रो 7 चं काम सुरु असताना कोसळला पिलर, एक जण जखमी
मुंबई - मेट्रो 7 चं काम सुरू असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. गोरेगाव ते आरेदरम्यान वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बांधकाम सुरू असताना हा पिलर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार गोरेगाव ते आरेच्या दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा पिलर कोसळल्याची माहिती समोर येते आहे. अंधेरी ते दहिसर प्रकल्पाचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मेट्रो 7 चे काम सुरू असताना पिलर अचानक खाली कोसळला. हा पिलर कोसळण्याच्या काही क्षण आधीच एक बेस्टची बस या रस्त्यावरून गेली आणि काही वाहनेही गेली होती. सुदैवाने यापैकी एकाही वाहनावर हा पिलर कोसळला नाही, तसे घडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.