Parner's five corporators back in ShivSena; Meet Uddhav Thackeray on Matoshree | पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट

पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : पारनेरच्या माजी आमदारांमुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मोठा वादाचा प्रसंग उभा केला होता. यावरून गेले तीन-चार दिवस शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये तणाव होता. अखेर शरद पवार यांचे मातोश्रीवर जाणे, दुसऱ्याच दिवशी ठाकरे यांनी अजित पवारांशी चर्चा करणे आदी घडामोडींनंतर महाविकासआघाडीतील पेच सुटला आहे. अखेर ते पाच नगरसेवक आज पुन्हा शिवबंधनात आले आहेत. 


 अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि ठाकरेंची मुंबईत सुमारे दीड तास बैठक झाली.  


यानंतर बुधवारी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर झाले. पवारांनी या पाचही नगरसेवकांना नार्वेकरांकडे सोपविले. यानंतर या नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले

एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parner's five corporators back in ShivSena; Meet Uddhav Thackeray on Matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.