मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 20:52 IST2025-07-29T20:50:54+5:302025-07-29T20:52:29+5:30

Mumbai Crime news in Marathi: मुंबईत एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Outrageous incident in Mumbai! A 10-year-old girl playing with her brother was taken to the garden and tortured. | मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार

मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार

Mumbai Crime News Latest: भावासोबत खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या मुलीला गार्डनमध्ये नेऊन आरोपींनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. मलबार हिल परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी सांगितले की, १० वर्षाची पीडित मुलगी आणि तिचा भाऊ घराबाहेर खेळत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन जातो असे आमिष दाखवले. 

भावाला दुकानात पाठवले अन्...

आरोपी बहीण आणि भावाला गार्डनमध्ये घेऊन गेल्यानंतर आरोपीने १० वर्षाच्या पीडित मुलीच्या भावाला दुकानात चॉकलेट आणण्यासाठी पाठवले. मुलगा दुकानातून निघून गेल्यानंतर आरोपीने त्या चिमुकलीवर गार्डनमध्येच बलात्कार केला. 

अत्याचार केल्यानंतर आरोपी पीडित मुलीला म्हणाला की, याबद्दल कुणालाही सांगितले तर तुला मारून टाकेन.

मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाला कशी फुटली वाचा?

हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर तिने आईला गार्डनमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन महिला मलबार हिल पोलीस ठाण्यात गेली आणि याप्रकरणी तक्रार दिली. 

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेच गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, मुलीवर अत्याचार केल्याची त्याने कबुली दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

Web Title: Outrageous incident in Mumbai! A 10-year-old girl playing with her brother was taken to the garden and tortured.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.