मागाठाणेत रक्तदान शिबिरांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:06 AM2021-04-18T04:06:31+5:302021-04-18T04:06:31+5:30

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मागाठाणे विधानसभेतील सर्व शाखा प्रमुख व शाखा संघटक यांनी नगरसेवक व विधानसभा संघटक, उपविभाग ...

Organizing blood donation camps in Magathan | मागाठाणेत रक्तदान शिबिरांचे आयोजन

मागाठाणेत रक्तदान शिबिरांचे आयोजन

Next

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मागाठाणे विधानसभेतील सर्व शाखा प्रमुख व शाखा संघटक यांनी नगरसेवक व विधानसभा संघटक, उपविभाग प्रमुख, उपविभाग संघटक यांच्या सहकार्याने विभाग संघटक सुजाता सिंगाडे व विभाग प्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना शाखांमध्ये उद्या रविवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर, कोविड-१९ लसीकरण केंद्राचे लोकार्पण, कोरोना रुग्णांना फळवाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता फक्त ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचे बोलले जाते. आणि म्हणूनच कोरोना रुग्णांना मदत व शासनाच्या कोरोना उपाययोजनेला प्रतिसाद देत आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणेतील सर्व रहिवाशांना विनंती केली आहे की, कोणीही वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार व भेटवस्तू घेऊन न येता ते पैसे कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी खर्च करावेत. तसेच भेटण्यासाठी वेळ खर्च न करता त्या वेळेत आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत जाऊन सर्वांनी रक्तदान करावे ही माझ्यासाठी वाढदिवसाची शुभेच्छा असेल, असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

-- --- -- - - - - - --------- - -- ----------

----------

Web Title: Organizing blood donation camps in Magathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.