Order of the Supreme Court, in the wake of five Zilla Parishads in the state by rural development ministry | राज्यातील 5 जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
राज्यातील 5 जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई - राज्यातील पाच जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या पाच जिल्हा परिषदांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांही बरखास्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी ग्रामविकास विभागाने 18 जुलै रोजी अधिसूचना जारी केली आहे. 

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदूरबार या 5 जिल्हा परिषदांचां यामध्ये समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत या 5 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. या पाचही जिल्हा परिषदेचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांचे कामकाज गट विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, या जिल्हा परिषदांवरील अध्यक्ष आणि सदस्यांचे कामकाज आजपासून थांबविण्यात आले आहे. दरम्यान, या जिल्हा परिषदांवर निवडणूक प्रकिया होऊनच अध्यक्ष आणि सदस्यांची निवड केली जाईल.  

 


 


Web Title: Order of the Supreme Court, in the wake of five Zilla Parishads in the state by rural development ministry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.