आता घाटात रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांच्यातील संवादातील अडथळा दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:47 PM2020-07-10T22:47:07+5:302020-07-10T22:48:11+5:30

मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागात दरड कोसळू नये, म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात. यामध्ये लोखंडी जाळ्या बसविणे, कमकुवत दरड काढणे अशी कामे केली जातात.

Now the barrier between the loco pilot and the guard in the ghat will be removed | आता घाटात रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांच्यातील संवादातील अडथळा दूर होणार

आता घाटात रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांच्यातील संवादातील अडथळा दूर होणार

Next
ठळक मुद्देकर्जत ते लोणावळा दरम्यान लिकी केबल बोगदा यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी १६ कोटी ४० लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा आणि कर्जत या दिशेकडील घाट भागात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांना संवाद करताना अडचणी येतात. त्यामुळे मध्य रेल्वेने संवादाकरिता अत्याधुनिक रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये  लोको पायलट, गार्ड, स्थानक मास्टर यासह घाट भागात काम करत असलेले सुरक्षारक्षकांचा तत्काळ संवाद होण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागात दरड कोसळू नये, म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात. यामध्ये लोखंडी जाळ्या बसविणे, कमकुवत दरड काढणे अशी कामे केली जातात. मात्र जोरदार पावसात खंडाळा आणि इगतपुरी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. रुळावर आलेल्या मोठमोठ्या खडकांमुळे मालवाहतूक गाड्या, पार्सल गाड्या, मेल-एक्स्प्रेस गाड्यांची सेवा खोळंबते. बोगद्यात, घाटात रेल्वे धावत असताना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लोको पायलट आणि गार्ड यांना जवळच्या रेल्वे स्थानकातील स्थानक मास्तरला माहिती देऊन मदत घ्यावी लागते. मात्र घाट विभागात पर्यायी साधनांनी संपर्क करण्यास अडचणी येतात. त्यामुळे त्वरित मदत उपलब्ध होण्यासाठी रेडीओ तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.

या तंत्रज्ञानाला फायबर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट सिस्टमने तयार केलेला माइक्रोवेब टॅावर, लिकी केबल यंत्रणा असेही म्हणतात. मागील वर्षी फायबर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट सिस्टमने तयार केलेला माइक्रोवेब टॅावर अर्थात लिकी केबल बोगदा क्रमांक ४९ मध्ये लावला होता. ही अत्याधुनिक यंत्रणा घाट विभागातील रेल्वे बोगद्यांमध्ये बसविण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये मध्य रेल्वेवरील सर्वप्रथम बोर घाटात मंकी हिल ते खंडाळा दरम्यानच्या सर्वात मोठ्या (२.४ किमी) बोगद्यात ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर बसविली होती. त्यासाठी २ कोटी ४७ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीचा रेल्वेला फायदा होत आहे.  

आता आणखी १७ बोगद्यात ही प्रणाली बसवण्यात येणार आहे.  ही यंत्रणा खासकरून भूमिगत खाणी आणि लेण्यांमध्ये वापरली जाते. रेडिओ तंत्रज्ञान कोणत्याही हंगामात उपयुक्त ठरते. यामध्ये बोगद्यात एक केबल टाकली जात असून  त्यातून रेडिओ लहरी उत्सर्जित होतात. त्यामुळे संवाद साधताना कोणताही अडथळा येत नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्याच आली.

कर्जत ते लोणावळा दरम्यान लिकी केबल बोगदा यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी १६ कोटी ४० लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.तर, पनवेल ते कर्जत आणि कसारा ते इगतपुरी दरम्यान यंत्रणा बसविण्यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.

घाटातील संवाद व्यवस्था मजबूत करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दक्षिण-पूर्व व उत्तर-पूर्व घाटातील बोगद्यात हि यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.
- प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
 

Web Title: Now the barrier between the loco pilot and the guard in the ghat will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे