दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:39 IST2024-04-30T11:39:01+5:302024-04-30T11:39:25+5:30

Loksabha Election 2024 - जणू काही मुंबईत संजय पाटील मिनी पाकिस्तानच बनवत आहे. पण ते मी कदापी होऊ देणार नाही असं सांगत त्यांनी मविआ उमेदवार संजय पाटील यांच्यावर आरोप केले. 

North East Mumbai Lok Sabha Constituency - Mihir Kotecha's MIA candidate targeting Sanjay Patil | दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर...

दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर...

मुंबई - ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेनंतर कोटेचा चांगलेच संतापले आहेत. मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर यावेळी पाठिमागून नव्हे तर समोरून वार करा असं खुलं आव्हान त्यांनी दिले आहे. 

मिहिर कोटेचा यांनी उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘टोपीवाल्या गुंडांनी ‘ मला इजा पोहचवण्याचे उद्देशाने माझ्यावर दगड भिरकवला. पण दुर्दैवाने माझ्या भगिनी भाजपाच्या कार्यकर्त्या निहारिका खोंदले यांच्या मानेवरती दगड लागला व मार बसला आहे. त्याबाबत त्यांनी रितसर पोलिसात तक्रार देखील केली आहे. संजय पाटील यांनी मानखुर्दला मुंबईच्या गुन्हेगारीचा अड्डा बनवलाय. जणू काही मुंबईत संजय पाटील मिनी पाकिस्तानच बनवत आहे. पण ते मी कदापी होऊ देणार नाही असं सांगत त्यांनी मविआ उमेदवार संजय पाटील यांच्यावर आरोप केले. 

तसेच संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंडाना माझं चॅलेंज आहे, उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा उघडपणे मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा पाठीमागून नाही असा टोला मिहिर कोटेचा यांनी विरोधकांना लगावला आहे. 

Web Title: North East Mumbai Lok Sabha Constituency - Mihir Kotecha's MIA candidate targeting Sanjay Patil