North Central Mumbai Lok Sabha Result 2019 bjp candidate Poonam Mahajan leading by almost 12500 votes congress leader priya dutt trailing | उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: भाजपाच्या पूनम महाजन सव्वा लाख मतांनी पुढे

केंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींमधील चुरस उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पाहायला मिळते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या आमनेसामने असलेल्या भाजपाच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी यंदाही एकमेकांना आव्हान दिलं. आजी-माजी खासदारांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पूनम महाजन यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली. सध्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात महाजन यांनी जवळपास सव्वा लाख मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 342135 मतं मिळाली असून प्रिया दत्त यांच्या पारड्यात 217348 मतं पडली आहेत.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 38 हजार 894 मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात 53.64 टक्के मतदान झालं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी 4 लाख 78 हजार 535 मतं मिळवली होती. तर प्रिया दत्त यांना 2 लाख 91 हजार 764 मतं मिळाली होती. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता या मतदारसंघानं एकाच पक्षाला सलग दोनदा संधी दिलेली नाही. त्यामुळे यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की इतिहास घडणार याची उत्सुकता आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: North Central Mumbai Lok Sabha Result 2019 bjp candidate Poonam Mahajan leading by almost 12500 votes congress leader priya dutt trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.