पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: November 27, 2020 10:14 AM2020-11-27T10:14:33+5:302020-11-27T10:15:08+5:30

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. 

NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party | पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

googlenewsNext

सोलापूर/ मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात पक्षावरील नियंत्रणावरून वाद नसला तरी सारं काही अलबेल नसल्याचं ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. तसेच पक्षावरील नियंत्रणावरून आमदार रोहित पवारांना बळ दिलं जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा धक्कादायक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. या दाव्यावरुन आता रोहित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

रोहित पवार म्हणाले की, पुस्तक कुठलही असलं तरी ते लिहिणाऱ्याच्या डोक्यानं लिहिलं जातं. माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे. हे नातं त्या लिहिणाऱ्यापेक्षा मोठं असल्याचं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं आहे. सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. 

कोणतंही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिलं जातं. आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात माझा जास्त वेळ जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेलं आहे. मी केवळ त्याचा कव्हर पेज पाहिलं आहे. आतमध्ये काय लिहिलं आहे याबाबत मला माहिती नाही. पुस्तकात आणखी काही गोष्टी लिहिल्याचं कळलं. त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावं लागेल, असं रोहित पवारांनी यावेळी सांगितले. 

पुस्तकात काय म्हटलंय?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छूक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

तर, पवार कुटुंबात वाद असे नाहीत. पण पक्षावरील कमांड कुणाची राहावी या मुद्द्यावरून पवार कुटुंबात सारं काही अलबेलही नाही. शिवाय पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं. तसं मिळालेलं नाही, असं प्रियम गांधी यांनी सांगितलं. त्यामुळे पवार कुटुंबात वाद नसले तरी काहीच अलबेल नसल्याचं अधोरेखित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Web Title: NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.