Join us  

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:34 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा काल अपघात झाला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला काल मंगळवारी रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून परत येत असताना पटोले यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अपघात प्रकरणी आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून चौकशीची मागणी केली आहे. 

नाना पटोले यांच्या कारच्या अपघात प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे,  कारचा झालेला अपघात हा फक्त अपघात होता की कट होता याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसनं 'या' २ जागांवर केले उमेदवार घोषित; रावसाहेब दानवेंविरोधात कोण लढणार?

दरम्यान, आता काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्याची मागणी केली आहे. प्रचारसभा आटोपून परत जाताना अपघात

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विदर्भामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. 

प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला वेगळा संशय

"ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी हा विषय सिरीअस घेतला पाहिजे. राजकारण म्हटलं की थोडीफार खुन्नस येतेच, असं नाही म्हणता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास केला पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.  त्या ड्रायव्हरची माहिती घेतली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी नेत्यांना अधिक संरक्षण दिलं पाहिजे, नाना पटोलेंच आरोग्य चांगल रहाव अशी इच्छा व्यक्त करतो. ऐन निवडणुकीच्या काळात अपघात झाला त्यामुळे इथे संशय घ्यायला जागा आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेभाजपालोकसभा निवडणूक २०२४