माझ्या नातेवाइकांना कोरोना झालाय, मदत कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:56 AM2020-04-30T01:56:11+5:302020-04-30T01:56:28+5:30

पवईमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू आहे.

My relatives have become corona, help! | माझ्या नातेवाइकांना कोरोना झालाय, मदत कर!

माझ्या नातेवाइकांना कोरोना झालाय, मदत कर!

googlenewsNext

गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : मित्राचे मेल अकाउंट हॅक करत त्यामार्फत ‘माझ्या नातेवाइकांना कोरोना झालाय, मला मदत कर’ अशा आशयाचे ईमेल करून प्राध्यापकाकडून लाखो रुपये उकळत त्यांना चुना लावण्यात आला. पवईमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू आहे.
विजय (नावात बदल) हे पवई आयआयटीमध्ये प्राध्यापक आहेत. विजय यांनी पवई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मित्राचा त्यांना २४ एप्रिल रोजी एक ईमेल आला. या ईमेलमध्ये ‘माझ्या नातेवाइकांना कोरोना झाला असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत,’ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच मला मोबाइलवर बोलणे शक्य नाही, त्यामुळे मी तुला ईमेल पाठवत असून मला रुग्णालयात भरण्यासाठी २० हजार रुपयांची गरज आहे, असे सांगण्यात आले. मित्राला संकटात पाहून विजय यांनी अमेझॉनमार्फत सदर रक्कम पाठवली. मात्र त्यानंतर पुन्हा ईमेलमध्ये ८० हजारांची मागणी करण्यात आली आणि विजयने तेदेखील पाठवले. त्यानंतर पुन्हा १ लाख पाठविले. इतके पैसे पाठवूनही पुन्हा जेव्हा त्यांना १ लाख पाठविण्याचा ईमेल आला तेव्हा विजयला संशय आला आणि त्यांनी मित्राला फोन करून विचारले. तेव्हा माझ्या कोणत्याच नातेवाइकाला कोरोना झाला नसून माझ्या मेलवरून अनेकांना असे मेल गेल्याचे त्याने सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे विजयच्या लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यामुळे अशा प्रकारच्या मेलबाबत खात्री करून नंतरच व्यवहार करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
>बनावट मेल पाठवणाऱ्या टोळ्या सक्रिय
कुणाचे तरी ईमेल अकाउंट हॅक करून त्याच्या त्या अकाउंटवरील त्याच्या परिचितांना खोटी कहाणी सांगणारे मेल पाठवून फसवणूक करणाºया अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे अशा ईमेलबाबत संबंधितांशी बोलून खात्री करून त्यानंतरच मदत करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Web Title: My relatives have become corona, help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.