'माझा महाराष्ट्र- माझी जबाबदारी' असं म्हणून मुख्यमंत्री पुढे हवेत, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:05 IST2021-03-02T18:03:10+5:302021-03-02T18:05:27+5:30
कोरोना कालावधीत आलेल्या अनुभवाचे कथन करताना, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिमच मुळात चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना कालवधीत आम्ही आरोग्य खात्याशी संपर्क केला,

'माझा महाराष्ट्र- माझी जबाबदारी' असं म्हणून मुख्यमंत्री पुढे हवेत, पण...
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊनच्या नियमावलीचे कडक पालन करण्याच्या सूचना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. तसेच, माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात मी जबाबदार मोहीम सुरू केली आहे. त्यावरुन, महाविकास आघाडी सरकावर मोठी टीका झाली. आता, मुख्यमंत्र्यांच्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेवरुन आमदार रवी राणा यांनी थेट विधानसभेतच टीका केलीय.
आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मी जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावेळी, माझं कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यावरुन, विधानसभेत अधिवेशन काळात आमदार रवि राणा यांनी टीका केलीय.
कोरोना कालावधीत आलेल्या अनुभवाचे कथन करताना, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिमच मुळात चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना कालवधीत आम्ही आरोग्य खात्याशी संपर्क केला, मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला. मात्र, आम्हाला हवा तसा प्रतिसाद आणि मदत मिळाली नाही. कोरोना कालावधीत केवळ ऑक्सीजन न मिळाल्याने 12 जणांचा जीव माझ्या मतदारसंघात गेला. मतदारसंघातील नागरिकांच्या, रुग्णांच्या समस्यांसाठी आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे मदत मागितल्याचे रवि राणा यांनी सांगितलं.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे सर्वांनाच माहिती असतं, प्रत्येक कुटुंब हे स्वत:ची जबाबदारी घेत असते. मग, मुख्यमंत्री म्हणून माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुढे यावे, असे आमदार राणा यांनी म्हटलं. विधानसभा सभागृहात बोलताना राणा यांनी सरकार अनेक पातळीवर अपयशी ठरत असल्याचं सांगितलं.