Mumbai Unlock Updates: मुंबईत लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता; लोकल तुर्तास बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:06 PM2021-06-03T17:06:59+5:302021-06-03T17:08:33+5:30

Maharashtra Unlock Updates: दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत हे निकष आहेत

Mumbai Unlock Updates: Partial relaxation in Mumbai lockdown; No decision has been made about local | Mumbai Unlock Updates: मुंबईत लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता; लोकल तुर्तास बंद राहणार

Mumbai Unlock Updates: मुंबईत लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता; लोकल तुर्तास बंद राहणार

Next
ठळक मुद्दे शुक्रवार पर्यंत जर पॉझिटिव्हीटी रेट कमीच राहीला तर मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो राज्यात ५ टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूकीस परवानगी असेल. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू होतील.

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने महाराष्ट्र सरकारनं राज्यातील लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्यापासून हे नियम लागू होती. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असून पूर्णपणे अनलॉक असणार आहे. तर मुंबईचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने याठिकाणी अंशत: निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत हे निकष आहेत. या घडीला मुंबई लोकल सेवा बंद असणार आहे. शुक्रवार पर्यंत जर पॉझिटिव्हीटी रेट कमीच राहीला तर मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी महत्त्वाची घोषणा मदत पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात ५ टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी आणि ठाणे, वर्धा, वासिम, यवतमाळ यांचा समावेश आहे. १८ जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. याठिकाणी संपूर्ण व्यवहार पुन्हा सुरू होतील. पहिल्या टप्प्यात शिथिलता आणल्यामुळे थिअटर सुरु होणार आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ही रेट ५ टक्के आहे त्याठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मॉल-दुकानं सुरु होणार, सार्वजनिक वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे. कार्यालये पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होतील. लग्न सोहळ्यासाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी

मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईची लोकल तुर्तास सुरू होणार नाही. मुंबई, मुंबई उपनगर, दुसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात निर्बंध पूर्णपणे शिथील करणार नसून अंशत: शिथिल होणार आहे. दर शुक्रवारी जिल्ह्याच्या आकडेवारीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल. ५ टप्प्यात राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिल करणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यापर्यंत आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन राहणार नाही. त्यात रेस्टॉरंट, मॉल्स, खुलं मैदान, सलून, जीम,  खासगी-सरकारी कार्यालये १०० टक्के उपस्थितींनी सुरु होईल. त्याचसोबत सास्कृतिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांना १०० टक्के लोकांना परवानगी आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. जमावबंदी-संचारबंदी पहिल्या टप्प्यात राहणार नाही. परंतु दुसऱ्या टप्प्यात संचारबंदी-जमावबंदी राहील. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूकीस परवानगी असेल. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू होतील.

पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे दुसऱ्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, नंदूरबार यांचा समावेश आहे. पालघर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. पुणे, रायगड या जिल्ह्यांचा चौथ्या टप्प्यात समावेश आहे.

Read in English

Web Title: Mumbai Unlock Updates: Partial relaxation in Mumbai lockdown; No decision has been made about local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.