मुंबई पोलिसांनी हृतिक रोशनचा जबाब नोंदविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:08 IST2021-02-28T04:08:08+5:302021-02-28T04:08:08+5:30

कंगना रनौतचे अश्लील ई-मेल प्रकरण मुंबई : प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याचा शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण ...

Mumbai Police recorded Hrithik Roshan's reply | मुंबई पोलिसांनी हृतिक रोशनचा जबाब नोंदविला

मुंबई पोलिसांनी हृतिक रोशनचा जबाब नोंदविला

कंगना रनौतचे अश्लील ई-मेल प्रकरण

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याचा शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने जबाब नोंदविला. त्यानिमित्ताने त्याने सुमारे तीन तास क्रॉफर्ड मार्केट येथील मुख्यालयात हजेरी लावली होती.

वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौत हिला आपला बोगस मेल आयडी वापरुन कोणी ई-मेल पाठवत असल्याची तक्रार त्याने चार वर्षांपूर्वी केली होती. त्याबाबतचा तपास पूर्ण करण्याबाबत त्याच्या वकिलांनी महिनाभरापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) केलेल्या तपासात कंगना रनौतकडून हृतिकला अश्लील मेल पाठविल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत त्याचा सविस्तर जबाब नोंदविण्यासाठी शनिवारी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार दुपारी पावणे बाराच्या सुमारास तो आयुक्तालयात आला. गुप्तवार्ता विभागाने त्याचा सविस्तर जबाब नोंदविला. त्याच्यासोबत त्याचे वकील व खासगी अंगरक्षकही उपस्थित होते. सुमारे तीन तास त्याचा जबाब नोंदविण्यात आला. पावणे तीनच्या सुमारास तो आयुक्तलयातून बाहेर पडला. त्यावेळी माध्यमाशी काहीही बोलण्यास नकार दिला.

हृतिक रोशन याच्या तक्रारीवरून सायबर सेलने रोशनचा लॅपटॉप आणि फोनही तपासासाठी घेतला होता. तसेच कंगनाने केलेले आरोप फेटाळून लावले होते. तिच्याशी कसलेही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.

Web Title: Mumbai Police recorded Hrithik Roshan's reply