मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादात

By Admin | Updated: November 11, 2015 02:08 IST2015-11-11T02:08:02+5:302015-11-11T02:08:02+5:30

वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटनानंतर तेथे

Mumbai Mayor Snehal Ambekar again promises | मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादात

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादात

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटनानंतर तेथे
सुरू असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरमुळे महापौरांवर विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे.
महापौरांनी डॉकयार्ड येथील ‘उस्तादी’ या फारूक काझी
यांच्या हॉटेलचे ६ नोव्हेंबर रोजी उद्घाटन केले होते. या हॉटेलमध्ये अनधिकृतरीत्या हुक्का पार्लर
सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. हा मुद्दा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडल्यानंतर विरोधकांनी महापौरांवर टीकेची तोफ डागली. यापूर्वीही वादग्रस्त दूरध्वनी संभाषण आणि आयुक्तांना पाठविण्यात आलेले पत्र यामुळे महापौर वादात सापडल्या होत्या.
दरम्यान, यासंदर्भात स्नेहल आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की याप्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करून तथ्य आढळल्यास संबंधित हॉटेलवर कारवाईचे निर्देश देण्यात येतील. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai Mayor Snehal Ambekar again promises