Mumbai: पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला 40 शाळकरी मुलांचा जीव, नेमकं काय झालं? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:24 IST2024-12-17T17:23:30+5:302024-12-17T17:24:28+5:30

Mumbai News: अंधेरी-कुर्ला रोडवर 40 शाळकरी मुलांना पिकनिकला घेऊन जाणाऱ्या बसमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai: Drunk driver; Police alertness saves lives of 40 school children, two arrested | Mumbai: पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला 40 शाळकरी मुलांचा जीव, नेमकं काय झालं? पाहा...

Mumbai: पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला 40 शाळकरी मुलांचा जीव, नेमकं काय झालं? पाहा...

Mumbai News: मुंबईच्याकुर्ला रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसने 50 हून अधिक लोकांना चिरडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्या घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना, आता मुंबईतील बस चालकाच्या निष्काळजीपणाचे एक अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात शाळकरी मुलांना पिकनिकला घेऊन जाणारी बस दिशाहीन चालत असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यांनी वेळीच बस थांबवली आणि मोठा अपघात टळला. बसचा चालक आणि वाहक अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.  

बस चालक आणि क्लिनर ताब्यात 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंधेरी-कुर्ला रोडवर वाहतूक पोलिसांना एका बसवर संशय आल्याने, त्यांनी बस थांबवली. यावेळी बस चालक आणि क्लिनर दारुच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बसमध्ये 40 शाळकरी मुले आणि एक शिक्षक होता. या घटनेनंतर सहार विभागाच्या वाहतूक पोलिसांनी चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अपघात!
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथील शाळेची मुले बसमधून पिकनिकसाठी जात होती. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि पालकांना बोलावण्यात आले. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

 

Web Title: Mumbai: Drunk driver; Police alertness saves lives of 40 school children, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.