Mohit Kamboj: 'यापुढे पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत अन् मलिकांची कंपल्सरी ड्रग्ज टेस्ट करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:22 PM2022-02-16T15:22:26+5:302022-02-16T15:23:23+5:30

Mohit Kamboj: विशेषत: संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी त्यांच्या ड्रग्ज टेस्टचा अहवाल जाहीर करावा.

Mohit Kamboj: 'Compulsory drugs test of Sanjay Raut and Malik before press conference', mohit comboj on Sanjay Raut | Mohit Kamboj: 'यापुढे पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत अन् मलिकांची कंपल्सरी ड्रग्ज टेस्ट करा'

Mohit Kamboj: 'यापुढे पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत अन् मलिकांची कंपल्सरी ड्रग्ज टेस्ट करा'

Next

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेनेत चांगलाच वाद पेटला आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणत मोहित कंबोज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर, मोहित कंबोज यांनीही फोटो शेअर करत संजय राऊतांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचं सांगितलं. त्यातच, राऊत विरुद्ध सोमय्या असाही सामना रंगला आहे. त्यातच, बाप-बेटे तुरुंगात जाणार असे म्हणत राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला होता. आता, मोहित कंबोजने यावरुन राऊत यांना पलटवार केला आहे.  

बाप-बेटे जेलमध्ये जातील तेव्हा जातील, पण लवकरच सलीम-जावेद जेलमध्ये जातील. फक्त सलीम आधी जाणार की जावेद यामध्ये स्पर्धा सुरू आहे, असा पलटवार मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर केला आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद घेण्यापूर्वी या नेत्यांची कंपल्सरी ड्रग्ज टेस्ट करायला हवी. विशेषत: संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी त्यांच्या ड्रग्ज टेस्टचा अहवाल जाहीर करावा. कारण, ते ज्या पद्धतीने बोलतात, ते जेव्हा हाय डोस घेतलेला असतो, तेव्हाच असे बोलातानाचे दिसून येते, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.


मोहित कंबोज यांनी संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन असून नवाब मलिक हे शरद पवार यांचे फ्रंटमॅन असल्याचे सांगितले. हे दोन्ही फ्रंटमॅन त्यांच्या नेत्यांना घेऊन डुबू नयेत, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.   

काय म्हणाले होते संजय राऊत

'बाप-बेटे जेलमध्ये जाणार वेट अँड वॉच. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे', असं ट्विट आज शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं. राऊतांच्या ट्विटचा रोख किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे. राऊतांच्या या टिकेला मोहित कंबोज यांनी आज एक व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांच्यावरही आरोप केले होते. 

Web Title: Mohit Kamboj: 'Compulsory drugs test of Sanjay Raut and Malik before press conference', mohit comboj on Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.