मोदींनी सगळ्यांनाच हातातले TEDDY BEER बनवले, राष्ट्रवादीचं 'व्हॅलेंटाईन कार्टुन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 16:00 IST2019-02-10T15:58:32+5:302019-02-10T16:00:21+5:30
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधान ...

मोदींनी सगळ्यांनाच हातातले TEDDY BEER बनवले, राष्ट्रवादीचं 'व्हॅलेंटाईन कार्टुन'
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या अकाऊंटवरुन हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील आजचा दिवस टेडी बिअर डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर मोदींना लक्ष्य करत देशातील सीबीआय, आरबीआय आणि मीडिया हे मोदींच्या हातातले टेडी बियर बनवल्याचा दावा मुंडेंनी केला आहे.
मोदी तुम्ही हे काय केले, सगळ्यांना हातातले टेडी बिअर बनवले, असे धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सीबीआय आणि आरबीआय सारख्या स्वायत्त संस्था असोत किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी प्रसारमाध्यमे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत सर्वांनाच आपल्या बोटांवर नाचविण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोदींच व्यंगचित्र काढण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात मोदींच्या एका हातात आरबीआय आणि सीबीआय लिहलेली पत्रके दिसत असून दुसऱ्या हातात एक बाहुलं दिसत आहे. या बाहुल्याला मीडिया असं संबोधत मीडिया, सीबीआय आणि आरबीआय हे मोदींच्या हातातील टेडी बियर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, आज टेडी बियर दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसने टेडी बियर कार्टुन काढले आहे.
#cbi_rbi सारख्या स्वायत्त संस्था असोत किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी प्रसारमाध्यमे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत सर्वांनाच आपल्या बोटांवर नाचविण्याचा प्रयत्न केला.href="https://twitter.com/hashtag/TeddyDay?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#TeddyDay#GoBackModipic.twitter.com/nE7uq8ZuSl
— NCP (@NCPspeaks) February 10, 2019